विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका किंवा इयत्ता कोड नं टाका उदा. पहिली-101,102,103,दुसरी201,202,203.. तिसरी301,302,303, चौथी401,402,403 पाचवी501,502,503 .

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका.किवा code no टाका उदा.तिसरी 301,302,303

ज्ञानरचनावादी 100 प्रश्न

ज्ञानरचनावादी 100 प्रश्न 
----------------------------------------
लहान मुलांना नेहमी असे प्रश्न विचारत रहा..चालना मिळेल  
इयत्ता पहिली ते आठवी साठी उपयोगी पडतील अशी १००  प्रश्न देत आहे.
यात सर्व विषयांचे प्रश्न समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे .
यात प्रश्नांची काठीण्य पातळी वाढवत नेली आहे.

०१.) तुमचे पूर्ण नाव सांगा.

०२.) तुमच्या आईचे नाव सांगा.

०३.) तुम्हाला किती भाऊ आहेत ?

०४.) तुम्हाला किती बहिणी आहेत ?

०५.) तुमच्या भावाचे नाव सांगा.

०६. तुमच्या बहिणीचे नाव सांगा.

०७.) मामा कोणाला म्हणतात ?

०८.) तुमच्या मामाचे नाव सांगा.

०९.) मामी कोणाला म्हणतात ?

१०.) तुमच्या मामीचे नाव सांगा.

११.) मावशी कोणाला म्हणतात ?

१२.) तुमच्या मावशीचे नाव सांगा.

१३.) आजी कोणाला म्हणतात ?

१४.) तुमच्या आजीचे नाव सांगा.

१५.) आजोबा कोणाला म्हणतात ?

१६.) तुमच्या आजोबाचे नाव सांगा.

१७.) तुमच्या काकाचे नाव सांगा.

१८.) तुमच्या काकीचे नाव सांगा.

१९.) तुमच्या शाळेचे नाव सांगा.

२०.) तुमच्या वर्ग शिक्षकांचे नाव सांगा.

२१.) तुमच्या मुख्याध्यापकाचे नाव सांगा.

२२.) तुमच्या आवडत्या शिक्षकांचे / madam चे नाव सांगा.

२३.) तुमच्या घरात एकूण किती माणसे आहेत ?

२४.) ग्रहांची नावे  सांगा.

२५.) पृथ्वीचा उपग्रह कोणता  ?

२६.) इंद्रधनुष्यात कोणकोणते रंग असतात ?

२७.) तुमच्या वर्गात एकूण किती मुले आहेत ?

२८.) तुमच्या वर्गात एकूण किती मुली आहेत ?

२९.) तुमच्या शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत ?

३०.) तुमच्या आवडत्या मित्राचे नाव सांगा.

३१.) तुमचा आवडता प्राणी कोणता ? का ?

३२.) तुमचा आवडता पक्षी कोणता ? का ?

३३.) तुमचा आवडता रंग कोणता ? का ?

३४.) तुमचे आवडते झाड कोणते ? का ?

३५.) दुध कोण देते ?

३६.) अंडी कोण देते ?

३७.) मासे कोठे राहतात ?

३८.) मासे काय खातात ?

३९.) पाण्यात राहणारे प्राणी कोणते ?

४०.) आपल्या गावाचे नाव सांगा.

४१.) आपल्या तालुक्याचे नाव सांगा.

४२.) आपल्या जिल्ह्याचे नाव सांगा.

४३.) आपल्या राज्याचे नाव सांगा.

४४.) आपल्या देशाचे नाव सांगा.

४५.) आपल्या देशाची राजधानी कोणती ?

४६.) आपल्या राज्याची राजधानी कोणती ?

४७.) आपल्या राज्याची उपराजधानी कोणती ?

४८.) आपल्या देशात किती राज्य आहेत ?

४९.) आपल्या राज्यात किती जिल्हे आहेत ?

५०.) आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत ?

५१.) मुख्य दिशा किती व कोणत्या?

५२.) उपदिशा किती व कोणत्या?

५३.) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?

५४.) आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?

५५.) आपले राष्ट्रीय फुल कोणते ?

५६.) आपले राष्ट्रीय फळ कोणते ?

५७.) आपला राज्य प्राणी कोणता ?

५८.) आपला राज्य पक्षी कोणता ?

५९.) आपला राज्य वृक्ष कोणता ?

६०.) आपले राज्य फुल कोणते ?

६१.) आपली राज्य भाषा कोणती ?

६२.) आपली राष्ट्रीय भाषा कोणती ?

६३.) आपले राष्ट्रीय गीत कोणते ?

६४.) आपल्या राष्ट्र ध्वजा चे नाव काय ?

६५.) आपला स्वातंत्र्य दिन केव्हा असतो ?

६६.) आपला प्रजासत्ताक दिन कधी असतो ?

६७.) महाराष्ट्र दिन कधी असतो ?

६८.) आपले राष्ट्र गीत कोणते ?

६९.) आपली मातृभाषा कोणती ?

७०.) आपला राष्ट्रीय खेळ कोणता ?

७१.) एका दिवसात किती तास असतात ?

७२.) एका तासात किती मिनिट असतात ?

७३.) एका मिनिटात किती सेकंद असतात ?

७४.) एका आठवड्यात किती दिवस असतात ?

७५.) एका महिन्यात किती दिवस असतात ?

७६.) एका वर्षात किती महिने असतात ?

७७.) वर्षाचे इंग्रजी महिने सांगा.

७८.) वर्षाचे मराठी महिने सांगा .

७९.) आठवड्याचे वार सांगा.

८०.) वर्षाचे ऋतू किती आहेत ?

८१.) वर्षातील ऋतूंची नावे सांगा .

८२.) वर्षात एकूण किती आठवडे असतात ?

८३.) भारताच्या राष्ट्र ध्वजावर किती रंग आहेत ?

८४.) अशोक चक्रात किती आरे आहेत ?

८५.) वजन मोजण्याचे एकक कोणते ?

८६.) लांबी मोजण्याचे एकक कोणते ?

८७.) द्रव्य मोजण्याचे एकक कोणते ?

८८.) एक किलोमीटर म्हणजे किती मीटर ?

८९.) एक लिटर म्हणजे किती मिली लिटर ?

९०.) एक किलो म्हणजे किती ग्रॅम ?

९१.) एक टन म्हणजे किती किलो ग्रॅम ?

९२.) एक डझन म्हणजे किती वस्तू ?

९३.) एक तोळा म्हणजे किती ग्रॅम ?

९४.) एक दस्ता म्हणजे किती पाने ?

९५.) एक रिम म्हणजे किती दस्ते ?

९६.) नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या शरीरात किती हाडे असतात ?

९७.) पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरात किती हाडे असतात ?

९८.) विमानासाठी कोणते इंधन वापरतात ?

९९.) सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता ?

१००.) माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी का आहे ?

सौजन्य- सदरील पोष्ट हि व्हाटसप वरुन copy paste आहे.पोष्ट निर्माता अननोन आहे...मुलांसाठी हि प्रश्नावली महत्वपुर्ण वाटली म्हणुन इथे प्रसिद्ध केली.

वर दिलेले 100 ज्ञानरचनावादी प्रश्न अत्यंत महत्वपुर्ण आहेत.मुलांसाठी उपयोगी आसलेली ही  माहिती आपणास निश्चितपणे आवडली असेलच,आवडल्यास खाली Enter Your Comment या ठिकाणी  Comment Box मध्ये आपला अभिप्राय लिहून Publish करायला  विसरू नका ..

No comments:

Post a Comment